वाल्मिक कराड ला अटक होणार

0
8

बीड,दि.24 (पीसीबी)
बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी यांना अटक करण्याचा इशारा नव नियुक्त एसपी नवनीत कावत यांनी दिलाय. तर आज शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन मंत्र्यांनी सुद्धा देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तुमच्या मनातल्या आरोपींपर्यंत पोलीस पोहोचतील असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे नाव न घेता बोट दाखवलेली चर्चा आता सुरु झाली.
तुमच्या मनातील शेवटच्या आरोपीपर्यंत सरकार पोहोचणार अस म्हणत मंत्री उदय सामंतांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव न घेता वाल्मिक कराडांकडे बोट दाखवलंय. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली. शरीरावरचा एकही भाग हल्लेखोरांनी सोडला नाही.
काही आरोपींना अटक झाली असली तरी मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांपासून ग्रामस्थ ते बीडच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा आहे. पण हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस असल्याने त्याला अटक होत नसल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. फक्त व्यवसायात नाही तर खुनांमध्ये सुद्धा भागीदारी असल्याची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.