बीड, दि. 14 (पीसीबी)
खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराड यांना आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी केज न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज केज न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले.