वाल्मिक कराडमुळे भाजपचा माजी नगरसेवक अडचणीत

0
4

पिंपरी, दि. २१ (पीसीबी)

खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शनमुळं भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे अडचणीत आले आहेत. सीआयडीकडून या प्रकरणी त्यांची अडीच तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर दत्ता खाडे यांनी, निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. त्याच्या चौकशीदरम्यान, वाल्मिक आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावं पुण्यात कोट्यांवधीची संपत्ती असल्याचे माहिती समोर आली. कराडने पुण्यात त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर उच्चभ्रु सोसायटीत ऑफीस स्पेसेस अशी कोट्यावधी रूपयांची मालमत्ता खरेदी केली आहे आणि या व्यवहारात भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे मध्यस्थी असल्याचा संशय सीआयडीला आला. त्यानंतर सीआयडीने दत्ता खाडेंना समन्स बजावला. यावेळी खाडे यांची सीआयडीने अडीच तास चौकशी केली. या चौकशी नंतर खाडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सीआयडी चौकशीत नेमकं काय विचारण्यात आलं असं विचारलं असता दत्ता खाडे म्हणाले, वाल्मिक कराडने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर जी मालमत्ता घेतली आहे, त्यावेळी मी बिल्डरला पैसे कमी करायला सांगितले का? माझ्याकडून काही पैशाचा व्यवहार झाला का? माझे आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का? असे अनेक महत्त्वाचे फिरुन फिरुन तेच प्रश्न विचारण्यात आले.
त्यावेळी मी, यामध्ये माझा काहीही संबंध नाही. ज्या प्रभागात ही मालमत्ता येते त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे. माझं याच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा देखील खाडे यांनी यावेळी केला आहे.

कराड आणि तुमची ओळख कशी अस विचारलं असता, बीडमध्ये येण जाण होत होते तेव्हा हा वाल्मिक कराड आहे आणि मी दत्ता खाडे इतकचं एकमेकांना माहिती होत. त्याच्याशी कधी संबंध आला नाही. वाल्मिक कराड आणि माझी (दत्ता खाडे) फक्त तोंड ओळख आहे. मी कधीही त्यांच्यासोबत फोनवर बोललेलो नाही. या प्रकरणाशी माझं काहीही संबंध नाही, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
तसेच कराडला अटक करण्यात आली तेव्हा कराडला लपवून ठेवण्याच्या आरोपा तुमच्यावर झाले त्यावर विचारले असता, खाडे म्हणाले, तसं असतं तर पोलिसांनी त्याचवेळी मला अटक केली असती.