मुंबई, दि. 13 (पीसीबी)
वाल्मिक कराड आणि त्याची टोळीने गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून राज्यातील अनेक शहरांमध्ये कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्या आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालया समोर असलेल्या इमारतीत कराड आणि त्याच्या टोळीने 25 कोटी रुपये खर्च करुन सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता वाल्मिक कराडच्या संपत्तीवर ईडी धाड टाकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरु असलेल्या एका इमारतीमध्ये कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आले आहेत. यासाठी कराड आणि त्याच्या टोळीने बिल्डरसोबत पंचवीस कोटीचा करार केला आहे.
इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक कराड आणि त्याची टोळी अडचणीत आली आहे. वाल्मिक कराड याने ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीन मालकांना 11 कोटी 20 लाखांची टोपी घातल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला.