वायसीएम रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड

0
233

बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – वायसीएम रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांच्या कॅश काउंटरवर नेमलेल्या तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडीट करून बिलाच्या रकमेचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आला असून तरुणाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य अंकुश खंडागळे (वय 23, रा. जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजीव शांताराम भांगले (वय 57, रा. पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य हा बीव्हीजी कंपनीतर्फे वायसीएम रुग्णालयात कामाला आहे. त्याला कॅश काउंटरच्या कामकाजासाठी व कॅश स्वीकारण्यासाठी नेमण्यात आले आहे. त्याने रुग्णालयातील रक्त पेढी विभाग, एक्सरे विभाग, सोनोग्राफी विभाग, शव गृह विभागासाठी रुग्णालयाने निश्चित केलेल्या रकमेच्या पावत्या एडीट करून बनावट पावत्या तयार केल्या. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून निश्चित केलेल्या रकमेप्रमाणे पैसे घेऊन त्यांना तशी पावती देत असे. मात्र जमा झालेली रक्कम त्याने रुग्णालयाच्या खात्यावर जमा न करता कमी रकमेच्या खोट्या पावत्या दाखवून रुग्णालयाची 68 हजार 260 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.