वायर कट केल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली

0
204

इलेक्ट्रिक वायर कट का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. तसेच फुटलेल्या बाटलीने वार करत तरुणाला जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री दहा वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी येथे घडली.

आकाश अंकुश खळगे (वय 27, रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ नडगिरी (रा. मिलिंदनगर, ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश यांनी आरोपीला लाईटची वायर कट का केली, असा जाब विचारला. त्या कारणावरून चिडून आरोपीने लोखंडी कोयता आणि काचेची बाटली आणून बाटली आकाश यांच्या डोक्यात फोडली. त्यानंतर फुटलेल्या बाटलीने आकाश यांच्या गालावर, मानेवर मारून त्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.