वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर खुनी हल्ला

0
114

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

मित्राचा कंपनीतील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

ओमकार अशोक खेगरे (वय 25, रा. साईरंग सोसायटी, कोलते पाटील, मारूंजी. मूळगाव मु.पो. खंबोली, ता. मुळशी, जि. पुणे) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 3) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी झोलो कंपनीचा मॅनेजर आणि सुपरवायझर यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र राहूल याचा कंपनीतील वाद मिटविण्यासाठी फिर्यादी ओमकार हा काटेवस्त्ी, पुनावळे येथील कंपनीत गेला. कंपनीतील मॅनेजर व सुपरवायझर यांना गरीबाला कशाला त्रास देता, असे म्हटले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी कंपनीतील पाच ते सहा जणांना बोलावून फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. फिर्यादी ओमकार हे पळून जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील पांढरा टी शर्ट घातलेल्या मुलाने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.