दि. 16 जुलै (पीसीबी) – वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षक थांबवण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून पूजा खेडकर यांना तसं कळवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना आता मसूरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण हे थांबवण्यात आले आहे. राज्य सरकारकडून पूजा खेडकर यांना तसं कळवण्यात आलं असून मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
सध्या पूजा खेडकर यांचं वाशिममध्ये प्रशिक्षण सुरू आहे. तर याच दरम्यान कलेक्टरिन बाईंना मोठा धक्का देण्यात आला आहे. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरूवातीला ३ जून २०२४ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. मात्र एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. वाशिममध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संदर्भात जे वाद सुरू झाले आहेत त्या वादादरम्यानच राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.