वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी

0
356

– वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन . 

पिंपरी दि. १५ (पीसीबी) -दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.

‘महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज ३०% स्वस्त देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने , आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे , दरवाढ मागे घ्याच शिवाय आता ही ३० टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे दाखवून द्या  ‘ असे आवाहन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. 

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच पंजाब मध्ये नव्याने आलेल्या आपच्या भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आजच्या निवेदनातून ‘ राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. वीज कंपन्यांचे कॅग / CAG ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अश्या मागण्या आज आम आदमी पार्टीने केल्या आहेत . जनतेच्या मनातही वीज बिल बाबत मह्विकास आघाडीवर रोष होता आता  नव्या सरकारला या मुद्द्यावरून आम आदमी घेरणार असे दिसते आहे .  

आजच्या आंदोलनात आप चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होते….

आप पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे च्या नेतृत्वाखाली ज्योती शिंदे , स्मिता ताई पवार ,महेश गायकवाड , वहाब शेख , प्रकाश हगवणे , संतोषी नायर , स्वप्निल जेवळे
, विजय अब्बाड , गोविद माळी , सरोज कदम ,राज चाकणे , ब्राह्मानंद जाधव , मीना ताई जावळे , जावळे मामा , आशितोष शेळके , यशवंत कांबळे , वैजनाथ शिरसाठ , अशोक तनपुरे , आदिनाथ सकट , संतोष कुमार गायकवाड , अजित सिह , चंद्रकांत हुंबरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.