वाकड मधून पाच किलो गांजा जप्त

0
20

वाकड, दि. 31 (पीसीबी)
वाकड येथे एका पान टपरी मधून पाच किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी करण्यात आली. याप्रकरणी एका टपरी चालकाला अटक करण्यात आली आहे.

पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय ३२, रा. वाकड) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. त्याच्यासह राजू (पूर्ण नाव पत्ता माहिती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव वाडेकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीतकुमार याची एमएसईबी चौकात साईश्री पण टपरी आहे. त्याने टपरी मध्ये विक्रीसाठी गांजा ठेवला. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टपरीवर कारवाई करत टपरी मधून पाच किलो १०० ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल फोन असा एकूण तीन लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.