वाकड, ताथवडे भागात ५ वर्षांपासून अजूनही विजेचा लपंडाप सुरुच, आयटी कर्मचारी बेजार

0
107

वाकड, दि. २४ – वाकड ताथवडे भागात गेले १२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भव्य गृहनिर्माण रहिवासी संकुलांची भर पडली असूनदेखील येथे गेले ५ वर्षांपासून विजेचा लपंडाप अजूनही सुरु आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील बहुसंख्य अभियंते याच पट्ट्यात निवासाला असल्याने त्यांची मोठी कुचंबना सुरू आहे. वारंवार तक्रार करूनही महावितरण अथवा कोणीही लक्ष देत नसल्याने लोकांमध्ये संताप आहे, असे पिंपरी चिंचवड कॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशन वाकड, ताथवडे कॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी ग्रुपचे संस्थापक सचिन लोंढे यांनी म्हटले आहे.

प्रसिध्दीपत्रकात ते म्हणतात, हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातून फेडरेशन प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे मी व माझ्या इतर सहकाऱ्यांनी महावितरणासोबत गेली अनेक वर्षे बैठका घेऊनही पुन्हा एकदा ५ वर्षांनी हा विजेचं लपंडाव सुरु झाला आहे. गेले काही वर्षे हा लपंडाव फेडरेशन च्या सतत पाठपुराव्यामुळे RMU युनिट लावल्यामुळे काही प्रमाणात थांबला होता परंतु आता पुन्हा एकदा आणखी एका नवीन समस्येने महावितरण ग्रस्त असल्याचे वाकड, ताथवडे मधील महावितरणचे श्री. वाघमारे यांकडून समजले.

त्यांच्या मते महावितरणच्या विद्युत उपकारणां मध्ये पावसाळी ओलाव्यामुळे हा लपंडाव सुरु आहे आणि तो कमी करण्यासाठी विद्युत प्रवाह २२kv वरून ११kv वर आणणे भाग आहे.

महावितरनाने कृपा करून हा विषय त्वरित मार्गी लावावा असा आग्रह येथील मध्यम व भव्य गृहनिर्माण संकुलांमधील रहिवासी असलेलया हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. दिवसाला ३-४ तास रोज हा लपंडाव सुरु असून कधी कधी या अनास्थेमुळे या वाकड, ताथवडे रहिवासीयांना घरून काम करण्याची मुभा असून देखील कामाच्या कार्यालयात मार्गस्थ होणे भाग पडत आहे. त्यामुळे या हजारो रहिवासीयांमध्ये रोषरुपी राग व्यक्त होत असून दिवसाला संपूर्ण संकुलावर ४०००- ५००० रुपये चे डिझेल जेनेरेटोर साठी देण्याची वेळ आली आहे.