वाकडमध्ये सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक

0
128

तुमच्या आधार कार्डचा हाय प्रोफाईल केसमध्ये वापर झाला आहे, अशी भीती दाखवून एकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना दत्त मंदिर रोड, वाकड येथे शुक्रवारी (दि. ७) दुपारी घडली.

संदीप कुमार युद्धविहीर सिंग (वय 41, रा. बेलविस्टा इम्प्रेस सोसायटी, दत्त मंदिर रोड, वाकड यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सिटी युनियन बँकेच्या अज्ञात खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांना फोन करून आपण डीएचएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या आधार कार्डाचा हाय प्रोफाईल केसमध्ये वापर झालेला आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्डचा आणखीन कुठे कुठे वापर झाला आहे, याचा तपास करायचा आहे, असे भीती दाखवून आरोपींनी फिर्यादीच्या बँक खात्यामधून सहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर पाठविण्‍यास भाग पाडून ऑनलाईन फसवणूक केली.