वाईन शॉप फोडून पाउण लाखाची विदेशी दारू चोरीला

0
322

दापोडी, दि. ८ (पीसीबी) – दापोडी येथे अज्ञाताने वाईन शॉप फोडून 77 हजारांची विदेशी दारू चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे राजा वाईन या दुकानात उघडकीस आली.

मनोज शंकर परदेशी (वय 48, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी हे राजा वाईन या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्याने वाईन शॉपच्या मागील बाजूचे खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. वाईन शॉप मधून 77 हजार 230 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम, मोबाईल चोरून नेले. शनिवारी सकाळी सव्वासात वाजता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.