वाईन शॉप फोडून पळवलं दुसरंच काही…

0
278

चाकण, दि. १४ (पीसीबी) – वाईन शॉपचे शटर उचकटून चोरट्याने एक लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी छेडा वाईन्स, चाकण येथे उघडकीस आली.

गणेश संजय चव्हाण (वय २०, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चाकण येथे वाईन शॉप आहे. त्यांनी सोमवारी रात्री दहा वाजता दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून ड्रॉवरमध्ये ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.