वसंत मोरेना अखेर वंचितच पसंत

0
141

दि 3 एप्रिल (पीसीबी )- लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारी संदर्भात चर्चा केली होती. यानंतर अखेर वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरवरून दिली आहे.