भोसरी, दि .7 (पीसीबी)
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हटलं जातं. या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांमधून विविध धर्माची आणि जातीची लोक शहरात वसलेली आहेत. अशातच घुसखोर बांगादेशीच प्रमाण वाढलं आहे.
पिंपरी- चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या परिसरात बांगलादेश आणि रोहिंग्ये यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले आहेत. भोसरी मध्ये वर्षभरात बारा बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे सर्व बांगलादेशी हे बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र ही नेहमीच या बांगलादेशकडून जप्त करण्यात आलेले आहेत.
या बांगलादेशींना नेमकं बनावट कागदपत्र कोण बनवून देतो. या मुळापर्यंत पोहचणे देखील पोलिसांची जबाबदारी आहे. वर्षभरात पकडण्यात आलेले ३३ बांगलादेशांना आणि रोहिंग्यांपैकी काही जणांचे पासपोर्टदेखील पोलिसांनी रद्द केलेले आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्ये यांना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे.