वर्षभरात निगडीपर्यंत मेट्रो धावणार, केंद्र सरकारची मंजुरी

0
186

१३० आठवड्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) – पुणे शहरातील सुविधा वाढवणाऱ्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. शिक्षण आणि उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प मंजूर केले जात आहे. कधीकाळी सर्वजनिक वाहतुकीसाठी पुणेकरांना फक्त पीएमपीएमएल बसचा पर्याय होता. आता मात्र पुण्यात मेट्रो आली आहे. मेट्रोचा विस्तारही केंद्र सरकारकडून केला जात आहे. पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी केले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. आता केंद्र सरकारने मेट्रोला निगडीपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

पिंपरी ते निगडी मार्गाला मंजुरी
नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार आहे. पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिला आहे. पिंपरी ते निगडी या ४.५१९ किलोमीटर ऐलिव्हेटेड मार्गांच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाचे १३० आठवड्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन ठेवले आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी ही स्थानके असणार आहेत. म्हणजेच निगडी ते कात्रज अशी थेट मेट्रो मिळणार आहे. यामुळे पुणे ते निगडी अशी मेट्रो पुणेकरांना मिळणार आहे.

मेट्रोचा हा चौथा मार्ग
पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट असा हा प्रकल्पाचे काम सुरु आहे. पिंपरी ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रो सुरु झाली आहे. शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या मार्गाचा बराच भाग अंडरगाऊंड आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा प्रवास मेट्रोने होणार आहे. त्यानंतरत केंद्र सरकारने निगडीपर्यंत मेट्रो वाढवण्यास मान्यता दिल्यानंतर निगडी ते कात्रजपर्यंत मेट्रो सुरु होणार आहे.