वर्दीतील नारीशक्तीचा सन्मान

0
558

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनच्या वतीने रावेत पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवार, दिनांक ०८ मार्च २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले.

यांमध्ये अंमलदार नीता टिळेकर, अश्विनी मेहता, अर्चना धाकडे, वर्षा गोरडे, मनीषा आदमाने, सुनीता तारडे, राजश्री घोडे यांना स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देवकुळे यांच्या हस्ते भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अमोल थोरात, सलीम शिकलगार, अरुण देवकुळे आणि तुषार देवकुळे यांची उपस्थिती होती. रावेत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक परवेज शिकलगार आणि अन्य अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला. कृतज्ञतापर मनोगतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.