पुणे, दि. 24 (पीसीबी) : वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण करून दिला समाजाला पर्यावरणाचा संदेश.
निघोजे येथील कुरणवाडी येथे जेष्ट महिला श्रीमती सगुणाबाई नानेकर यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदत्त भावनेतून आपल्या वडिलांच्या 5 व्या पुण्यस्मरण निमित्ताने,आंबा,चिंच,जांभूळ,अशा 65 देशी झाडांचे वृक्षारोपण करून नवीन पायंडा समाजासमोर पाडला आहे. आपल्या वडिलांची आठवण आयुष्यभर स्मरणात रहावी या उदात्त भावनेतून आम्ही वृक्षरोपण केल्याचे खेडचे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर यांनी सांगितले.
प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून वृक्षरोपण करावे.आपल्या मोकळ्या जागेत किंवा पडीक जमिनीवर झाडे लावून ते जगावावेत म्हणजेच पर्यावरणाचे क्षेत्र ही वाढेल आणि त्या झाडांशी आपले भावनिक नातेही राहील असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी वृक्षारोपणाच्या वेळी सांगितले. नुसते झाडे न लावता त्यांचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. महाराष्ट्र शासनाचे वृक्ष मित्र अरुण पवार म्हणाले कि पर्यावरण रक्षणासाठी एक झाड भारत मातेसाठी वृक्ष लावणे व जगवणे हे फक्त शासनाचे काम नसून आपणही आपले पर्यावरण वाचण्यासाठी वृक्षरोपण केले पाहिजे.प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी आपण जो वेळ देतो त्या वेळेतील 50% वेळ पर्यावासाठी देण्याचे आवाहन अरुण पवार यांनी केले.
पुण्यस्मरण निमित्त गुणवंत कामगार ह.भ.भ शामराव गायकवाड महाराज याचे सुस्त्राव्य किर्तन झाले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, खेड तालुका अध्यक्ष शंकर नानेकर, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, वर्षा नानेकर,एचडीएफसीचे शाखा व्यवस्थापक सोपान नाणेकर,सगुणाबाई नानेकर,
खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री.आशिष येळवंडे, वृक्षमित्र अरुण पवार , विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष कैलास येळवंडे,रोहिदास येळवंडे, ह.भ.प श्री. गोविंद महाराज नाणेकर, ह.भ.प श्री.शामराव गायकवाड ,मयुर येळवंडे, विनित नाणेकर,मनिषा नाणेकर ,श्री.बाळासाहेब कांबळे, श्री.बाजीराव येळवंडे ,श्री.तुकाराम मराठे,प्रकाश जामदार, काळुराम येळवंडे,नामदेव नाणेकर काळूराम लांडगे,रामभाऊ नाणेकर, श्री.संभाजी येळवंडे, श्री.विठ्ठल येळवंडे ,आण्णा गुरव,विठ्ठल सुक्रे, सौ. द्रोपदा मोरे, सौ. शारदा भोसले, अर्चना नाणेकर, अभिजित नाणेकर ,हर्षल नाणेकर , यश शिंदे उपस्थित होते.