वडिलांचा अपमान करणाऱ्यास मुलाची मारहाण

0
72

महाळुंगे, दि. 21 (पीसीबी) : सप्ताहाच्या कार्यक्रमात वडिलांच्या हातातून एका व्यक्तीने माईक काढून घेतला. त्या रागातून मुलाने माईक काढून घेणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करून चेहऱ्यावर फॉरमोलीन नावाचे औषध टाकून दुखापत केली. तसेच घराच्या दरवाज्यावर मारून नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 20) मध्यरात्री खेड येथे घडली.

स्वयम सबाजी सावंत, सोनू बहिरू केदारी (दोघे रा. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 मध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमात फिर्यादी यांच्या पतीने आरोपी स्वयम याच्या वडिलांच्या हातातून माईक काढून घेतला होता. त्या रागातून स्वयम याने फिर्यादी यांच्या घरी येऊन फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. घराच्या सेफ्टी दरवाजाच्या जाळीतून पोल्ट्री फार्ममध्ये सफाईसाठी वापरले जाणारे फॉरमोलीन हे औषध फिर्यादी यांच्या पतीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांच्या डोळ्यास दुखापत केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानाच्या शटर, दरवाजावर आणि दुचाकीवर दगड आणि दांडक्याने मारून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.