वडमुखवाडी येथे दारूभट्टीवर पोलिसांना छापा

0
253

दिघी, दि. ६ (पीसीबी): दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथे खदानीजवळ सुरु असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी करण्यात आली.

रणजीत करण विश्वकर्मा (वय 42), प्रीतम राठोड (रा. वडमुखवाडी, चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योग्श्वर कोळेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वडमुखवाडी येथील खदानीजवळ गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत दारू भट्टी उध्वस्त केली. आरोपींनी 13 हजार 700 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दोन लाख 47 हजारांचे रसायन नष्ट केले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.