वडगाव शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी ओंकार भांगरे

0
295

वडगाव मावळ, दि. १६(पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगाव शहर कार्यकर्त्यांचा मावळगड कार्यालय येथे मेळावा १५ ऑगस्ट (मंगळवार) रोजी पार पडला. यावेळी वडगाव शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी ओंकार भांगरे तर उपाध्यक्षपदी दिनेश म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. तसेच मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अनेक तरुणांनी मनसे पक्षात प्रवेश केला.

यावेळी मनसे ज्येष्ठ नेते तानाजी तोडकर,सुरेश जाधव, वडगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, महिला शहर अध्यक्षा अर्चना ढोरे, माजी शहराध्यक्ष गणेश भांगरे, अनिल नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वडगाव मधील असंख्य तरुणांनी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी त्यांना तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या दरम्यान मनसे विद्यार्थी सेना वडगाव शहर अध्यक्षपदी ओंकार नितीन भांगरे व उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय म्हाळसकर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.