खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मैदान, उद्यानाचे सुशोभीकरण
पिंपरी – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास निधीतून मावळ तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. वडगाव आणि तळेगावदाभाडे मध्ये दोन कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचे भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
आमदार सुनील शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना महिला जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे,विशाल हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना शहर प्रमुख देवा खरटमल, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, दिपक हुलावळे, माजी नगरसेवक निखिल भगत, कल्पेश भगत, शिवसेना महिला तळेगाव शहर संघटीका विनाताई कामत, सुरेश जेंड उपस्थित होते. तळेगावदाभाडे यशवंतनगर येथील गोळवलकर गुरूजी मैदान व उद्यान सुशोभीकरणाची मागणी केली जात होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी विशेष निधीतून ५० लाख रुपयांच्या निधी दिला आहे. त्यासह इतर विकासकामांसाठी ५० लाख अशी एक कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर वडगाव येथे एक कोटी दहा लाख रुपयांच्या कामांचेही भूमीपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. वडगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. प्रविन निकम, भाजप मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, पोटोबा देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, गणेश ढोरे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धनराज दराडे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, प्रविण चव्हाण, नवनाथ हारपुडे,
प्रविण ढोरे, शेखर भोसले, संभाजी म्हाळस्कर, रुपेश म्हाळस्कर, खंडू भिलारे, पंढरीनाथ ढोरे, किरण म्हाळस्कर, सुभाष जाधव उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ विधानसभेतील जनतेने तिन्ही निवडणुकीत मला साथ दिली. मताधिक्य दिले. त्यामुळे यातून उतराई होण्यासाठी सर्वाधिक निधी मावळला दिला आहे. मावळमधी वाड्या, वस्त्यांमधील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. अंतर्गत रस्ते, मैदाने, उद्यान विकसित केली आहेत. केंद्रात, राज्यात महायुतीचे सरकार आहे. तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. देहूरोड वायजंक्शन ते वाकडपर्यंतच्या रस्त्याला गती मिळाली आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानके अत्याधुनिक केली आहेत. लोणावळा ते पुणे तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकच्या कामाबाबत सरकार सकारात्मक आहे. राज्य शासनाने त्यांचा हिस्सा देण्यासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. विकास कामे करण्यासाठी राज्य सरकार ठाम आहे. विकास कामांमध्ये कोणाीही राजकारण आणू नये, सर्वांनी एकत्रित येऊन विकास कामे करुयात.
आमदार सुनील शेळके म्हणाले, खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मावळ विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून चांगली विकास कामे करत आहोत. भविष्यातही प्रलंबित कामे मार्गी लावली जातील. विकासासाठी सदैव एकत्रितपणे काम केले जाईल.