वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत

0
303

चिंचवड, दि. २४ जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला आहे. शहराध्यक्षपदाच्या काळात पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहीन. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्याप्रमाणेच कार्यकर्त्यांना ताकद देण्याची भूमिका ठेवणार आहे, अशा भावना भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वी तशी घोषणा केली. यानंतर चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये त्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.

यावेळी यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, पूर्व महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे, प्रदेश निमंत्रित सदस्य सदाशीव खाडे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी, पूर्व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख, विकास डोळस, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य राजेश पिल्ले, संतोष कलाटे त्याचप्रमाणे शैलाताई मोळक, विकास डोळस, मोरेश्वर शेडगे, सचिन साठे, महेश कुलकर्णी, विलास मडीगेरी, संकेत चोंधे, उज्वलाताई गावडे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, विजय शिनकर, महेंद्र बाविस्कर, महादेव कवितके, राजेंद्र लांडगे, कोमल शिंदे, कमलेश बहरवाल, अजित कुलथे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, शंकर जगताप यांच्या पाठीशी पूर्व शहराध्यक्ष तथा लोकनेते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा वारसा आहे. त्यांचा आदर्श त्यांनी डोळ्यांसमोर ठेवला आहे. या सोबतच त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख आणि पूर्व नगरसेवक म्हणून अनुभव आहे. यापुढील काळात शंकर जगताप यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून खंबीरसाथीने उभा राहणार आहे. कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. जसे माझ्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहिलात, त्याच ताकदीने आपण शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्यसभेचे पूर्व खासदार अमर साबळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये दर ३ वर्षाने अध्यक्ष हा बदलत असतो. पक्षाने निवड केलेल्या अध्यक्ष्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पक्ष संघटना बळकटीकरण करावे हेच आपल्या पक्षाचे संस्कार आहेत. त्याचे आपण सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले. सूत्रसंचालन राजू दुर्गे यांनी केले. काळूराम बारणे यांनी आभार मानले.