वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीत मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य

0
73

अकोला, दि. 09 (पीसीबी) : एकीकडे महाराष्ट्रातील विधान सभा निवडणूकीच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. दुसरीकडे राज्यातील वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवाराची दुसरी यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूकांच्या वेळी देखील महाविकास आघाडीत सामील होणार की नाही असा सस्पेन्स कायम ठेवत वंचितने स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या होत्या. आताही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी फारकत घेत स्वतंत्रपणे विधान सभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणीत काँग्रेसचा मोठा मुस्लीम नेता वंचितच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे माजी उप महापौर आणि विद्यमान महापालिकेचे सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान (माजु लाला) यांना वंचितकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवारी घोषीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दहा मुस्लिम उमेदवारांच्या यादीत सय्यद समी यांच्या नावाचा समावेश आहे. सय्यद समी परभणी काँग्रेसचे दिग्गज नेते असून 2014 विधानसभा निवडणुकीत सय्यद सामी यांचे भाऊ सय्यद खालेद यांनी विधानसभा निवडणूक लढवत 45 हजार मतदान घेत दुसरा क्रमांक गाठला होता. त्यामुळे सय्यद समी यांच्या उमेदवारीने परभणीत महाविकास आघाडीला वंचितने मोठा हादरा दिल्याचे मानले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे.

मलकापूर विधानसभा मतदार संघ क्रमांक 21 मधून शाहेजाद खान सलीम खान,

बालापूर 29 मधून खतीब सईद नतीकुद्दीन,

परभणी 96 मधून सईद सामी सईद साहेबजान,

औरंगाबाद सेंट्रल 107 मधून मोहम्मद जावीद मोहम्मद इश्क,

गंगापूर 111 मधून सयैद गुलाम नबी सयैद,

कल्याण पश्चिम 138 मधून अयाझ गुलजार मौलवी,

हडपसर 213 मधून एड.मोहम्मद अफ्रोज मुल्ला,

माण 258 मधून इम्तियाज जफर नडाफ,

शिरोळ 280 मधून आरिफ मोहम्मद अली पटेल,

सांगली 282 मधून आल्लाउद्दीन हयातचॉंद काजी.

पहिल्या यादीतील उमेदवार
वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या यादीत खालील प्रमाणे उमेदवार देण्यात आले होते. रावेर – शमिभा पाटील,शिंदखेड राजा – सविता मुंढे, वाशिम – मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे, साकोली – डॉ. अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण- फारुख अहमद, लोहा – शिवा नारांगले, औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर – संग्राम कृष्णा माने