लोणी काळभोर पोलिसांची इंधन माफियांवर मोठी कारवाई

0
377

लोणी काळभोर, दि. ९ (पीसीबी) –  लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी ता. 8) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास कदमवाकस्ती हद्दीतील इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन, दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी इंधन चोरीच्या अड्ड्याचा मालक व अड्डा चालत असलेल्या जमिनीच्या मालकासह तब्बल सात जणांना अटक केली आहे.

पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी तीन महिण्यापुर्वी तरडे ग्रामपंचायत हद्दीतील इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन, अशाच प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईचा धुरळा खाली बसण्यापुर्वीच लोणी काळभोरचे डॅसिंग वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी कदमवाकस्ती हद्दीत कारवाई केल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान वरील कारवाईत लोणी काळभोर पोलिसांनी धिरज विठ्ठल काळभोर (वय -३६ शेती रा. कदमवाकवस्ती ता हवेली) या इंधन माफियासह अमिर मलिक शेख (वय-३२, धंदा ड्रायव्हर रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर, मुळ गाव मु. पो पिंपळे (आर) ता. बार्शी जि सोलापुर), सचिन भाऊराव सुरवसे (वय-३० धंदा हेल्पर रा. सिद्राममळा, लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे मुळे रा भाळवणी जेऊर ता करमाळा), विजय मारुती जगताप (वय-५२ धंदा- व्यवसाय रा. अंबरनाथ मंदीराजवळ ता हवेली), रामचंद्र रावसाहेब देवकाते (वय ४१ ड्रायव्हर रा. संभाजी नगर लोणीकाळभोर), धिरज विठ्ठल काळभोर (वय -३६ शेती रा. कदमवाकवस्ती ता हवेली), इसाक इस्माइल मजकुरी (वय ४२ धंदा मजुरी रा. संभाजी नगर ताराहाइट्स बी / ४०४, लोणीकाळभोर ता हवेली) या पाच सहकाऱ्यांना पोलिसांनी अआटक केली आहे. तर इंधन चोरीसाठी जागा उपलब्द करुन दिल्याबद्दल महेश बबन काळभोर वय ४२ धंदा शेती रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर ता हवेली) यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बाजीराव वीर यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती येथील भारत टायर्स या दुकानाच्या पाठीमागील जागेत दोन टॅकरमधुन पाच ते सहा जण टॅंकरमधुन चोरुन इंधन काढत असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व सहायक पोलिस निरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना धिरज काळभोर व त्याचे सहकारी इंडीयन ऑईल कंपणीच्या दोन टॅंकरमधुन चोरुन व अतिशय धोकादायकत पध्दतीने पेट्रोल व डिझेल काढत असल्याचे पोलिसांना आढळुन आले. यावेळी सदर जागेची तपासणी केली असता, पोलिसांना आरोपींकडून इंधन भरलेले दोन भरलेले टँकर, ७ मोबाईल फोन, लोखंडी सळई, चोरलेले इंधन असा ७९ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल आला.

कारवाई रोखण्यासाठी पोलिसांनी राजकीय व पैपाहुण्याचा दबाव झिडकावला..
दरम्यान वाकवस्ती येथील इंधन चोरीच्या अड्ड्यावर पोलिस अधिकारी व त्यांचे पथक पोचण्यापुर्वीच कारवाई होऊ नये यासाठी पोलिसांच्यावर राजकीय व पैपाहुण्यानी दबाव टाकण्यास सुरवात केली होती. मात्र लोणी काळभोरचे डॅसिंग वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी राजकीय व पैपाहुण्याचा दबाव झिडकारत कारवाई पुर्ण केली. या कारवाईत इंधन माफियाबरोबरच, इँधन अड्ड्यासाठी जागा देणाऱ्या जागा मालकावर कारवाई झाल्याने, पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.