लोणी काळभोर, उरुळी कांचनसह जिल्ह्यातील तरुणांमध्ये नशायुक्त विडा खाण्याची क्रेझ ; 35 रुपयांच्या एका पानात दारूच्या बाटलीची नशा?

0
6

लोणी काळभोर : पुणे शहर व जिल्ह्यातील पानटपरीवर गुटखा, सुगंधित तंबाखू , सिगारेट व नशेली पाने विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर पानटपरीवर नशेली पाने खाण्याची तरुण व तरुणींमध्ये क्रेझ लागली असून त्यांच्या पान खाण्यासाठी मैफिली रंगल्या आहे. याच्या एका पानात दारूच्या बाटलीइतकी नशा आहे. अशी तरुणांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तर या संदर्भात संबंधित शासकीय विभागाने तातडीने हालचाली करून या नशायुक्त पानावर बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

पुणे शहरात व शहरालगतच्या परिसरातील चौकाचौकांमध्ये मिळत असल्याने या पानाचा विढा खाण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ लागली आहे. या पानाचा विढा खानाऱ्यांमध्ये हडपसर, कदमवाकवस्ती लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. एका पानाची रक्कम 30 ते 35 रुपये आहे. या पानामध्ये फुलचंद, पंचरत्न, नवरत्न व 120,300 बनारस व कलकत्ता पानांचा समावेश आहे. या पानांमध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी, कात, चुना, रिमझिम व एक अनोळखी नशेली पदार्थ टाकला जातो. आणि याच पानाचा विढा खाण्यासाठी तरुण व तरुणींमध्ये पैशांच्या पैजा लागल्या जात आहेत.

हडपसर, 15 नंबर, शेवाळवाडी, मांजरी, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन मधील एललाईट चौक व तळवडी चौकात या नशीली पानाच्या टपऱ्या आहेत. यामधील बहुतांश टपऱ्यांमधून पानांची जोरदार विक्री सुरु असून तरुण व तरुणी पानाच्या आहारी गेले आहेत. या मैफिलीच्या टपऱ्यांवर तरुणांची नेहमी गर्दी पाहायला मिळत आहे. या पानाचा सुगंधित वास येत आहे. मात्र दारूच्या एका बाटलीची नशा येत आहे.

एखाद्या तरुणाने पहिल्यांदा हे पान सेवन तर त्याला मळमळ,उलट्या व चक्कर येते. तर विडा खाणाऱ्या तरुणांच्या पालकांना केवळ मुलाने पानच खाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यातून तो वाचला जात आहे. मात्र याचा परिणाम थेट तरुण-तरुणीच्या आरोग्यावर होत आहे. व भविष्यात नशीली पानाचा विडा खाणाऱ्या तरुणांना कर्करोगासारख्या भयंकर आजारांचा सामना करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पूर्व हवेलीतील अनेक टपऱ्यांमधून या नशीली पानाची खुलेआम विक्री होत आहे. मात्र याकडे तरुणांच्या पालकांसह पोलीस प्रशासनासह अन्न आणि औषध विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीचे भविष्य हे धुम्रपानासह या नशिली पानाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे पुढील तरुण पिढी नशामुक्त करायची असेल तर गुटखा, तंबाखू , सिगारेट व नशीली पान विकणाऱ्या टपरी चालकांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.