दि . २७ ( पीसीबी ) – लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. यानंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनेचा तपास करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी 12 तासांत अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिलीये. तर इतर दोन आरोपी फरार असून या नराधमांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.