लोखंडी पाईपला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
72

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) :

दुचाकीवरून जात असताना लोखंडी पाईपला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी येथे घडली.

हृतिक मारुती लहानमटे (वय २३, रा. हिजवडी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बालाजी गुलाब पालापुरे (रा. मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील डी मार्ट जवळील रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु आहे. तेथे दोन बॅरिकेट्सला आडवा लोखंडी पाईप लावला आहे. दरम्यान, हृतिक हे दुचाकीवरून जात असताना त्यांना हा पाईप न दिसल्याने हृतिक त्यास धडकले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने हृतिक यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.