लोकांचा प्रचंड उत्साह आणि आपुलकीने आता उमटवली शंकर जगतापांच्या आमदारकीवर वियजाची ‘मोहोर’जुनी सांगवीत आमदार अश्विनी जगताप यांचा बैठका, कोपरा सभांचा धडाका

0
45

चिंचवड, दि. १३ – जुनी सांगवीतील नागरिकांनी स्व. लक्ष्मणभाऊ आणि त्यांच्या कुटुंबावर कायम प्रेम केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आताही तेच प्रेम आणि तोच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहून या विधानसभा निवडणुकीतही आमच्या विजयाचा विश्वास दुणावला असल्याची भावना; आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी जुनी सांगवी परिसरातील मधुबन सोसायटी, शितोळे नगर, पवार नगर, लक्ष्मी नगर, ममता नगर, पवनानगर, प्रियदर्शनी नगर, शिवांजली रोड भागात बैठका, कोपरा सभा तसेच महिला बचत गटांशी संवाद साधला.

जुनी सांगवी परिसराचा कायापालट स्व. आमदार लक्ष्मणभाऊ यांच्यामुळे झाला. आज आम्हाला सांगवीकर अशी ओळख सांगताना अभिमान वाटतो. याचे सर्वस्वी श्रेय हे स्व. लक्ष्मणभाऊंचे आहे. त्यामुळे त्यांचाच वारसा पुढे चालवणारे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी मताधिक्य आम्ही देणार असल्याचा निर्धार, जुनी सांगवी परिसरातील नागरिकांनी यावेळी केला.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे, सोनाली जम, उज्वला सुनील ढोरे, मंदाकिनी तनपुरे, सारिका भंडलकर, संगीता दीक्षित, दर्शना कुंभारकर, सोनाली शिंपी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या १० वर्षांत स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आमदार फंडातून जुनी सांगवी भागात अनेक विकासात्मक कामे केली. विविध आरोग्य शिबिरे घेतली. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ उभारले. यासह आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले. त्यांनी जनहितासाठी अनेक विकासकामे केली. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे राहिलात. यावेळीही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना तुमचा मतरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन आमदार आश्वनी लक्ष्मण जगताप यांनी केले.