लोकसभा निवडणूक निकालाबाबत शेअर बाजारचा अचूक अंदाज असा…

0
108

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचे निकाल पुढील आठवड्यात ४ जून रोजी जाहीर होणार आहेत आणि शेअर बाजारासाठी हा मोठा दिवस आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मतदानापासूनच अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी, साप्ताहिक मुदत संपण्याच्या एक दिवस आधी, सलग चौथ्या दिवशी घसरणीने बंद झाला असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आह एक नफा बुक करायचा की निवडणुकीच्या निकालाची वाट पाहायची, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे.

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येणार की भाजपची अवस्था २००४ मधील ‘इंडिया शायनिंग’सारखी होणार या निकालांवरून स्पष्ट होईल. अशा स्थितीत, देशाबरोबरच बाजारपेठेवरही लक्ष लागून असून या दरम्यान, विविध ब्रोकरेज हाउसेसनी भाजपच्या जागांसाठी वेगवेगळे अंदाज बांधले आहेत. या ब्रोकरेज हाऊसेसमध्ये PhilipCapital, IIFL, JMFL आणि Bernstein यांचा समावेश आहे. चला तर मग सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष एनडीएला ब्रोकरेजने किती जागा दिल्या आहेत जाणून घेऊया…

लोकसभेत भाजपला किती जागा मिळणार
सामान्य स्थितीत भाजप २९० ते ३०० जागा जिंक्यचा फिलीप कॅपिटलने अंदाज बांधला आहे तर एनडीएसाठी ३३० ते ३४० जागा निश्चित केल्या आहेत. ब्रोकरेजचा हा अंदाज खरा ठरला तर आगामी सरकार धोरणातील सातत्य आणि अंमलबजावणीमुळे इक्विटी, कॉर्पोरेट कमाई आणि अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन राखण्याची अपेक्षित आहे. या ब्रोकरेज हाऊसने बुल प्रकरणात (आक्रमक) भाजप ३२५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला असून एनडीएला ३६० पेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हटले तर बेअर प्रकरणात (सर्वात वाईट परिस्थिती) भाजपला बहुमत मिळणार नाही तर एनडीए आघाडी सरकार स्थापन करेल असे मानले जात आहे.

ब्रोकरेज हाऊस IIFL ने सामान्य परिस्थितीत भाजप ३२० जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला त्याचवेळी या प्रकरणात भारतीय जनता पक्षाला २९९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला असून बेअर प्रकरणात भाजपला २९० जागा मिळतील असे म्हटले तर बुल स्थितीत भाजपला ३१० जागा मिळण्याची शक्यता ब्रोकरेजने वर्तवली आहे.

दुसरीकडे, ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनचा भाजप आणि एनडीएबाबतचा अंदाज खूपच जास्त आहे. सामान्य परिस्थितीत ब्रोकरेजनी एनडीएला ३३० ते ३५० जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला. बुल परिस्थितीत, एकट्या भाजपला २९० जागा मिळू शकतात तर एनडीए ३४० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करू शकतात. एकंदरीत बहुतांश ब्रोकरेजने भाजपच्या बाजूने कल दिला असून मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल आणि २००४ मधील ‘इंडिया शायनिंग’ स्थितीची पुनरावृत्ती होणार नाही, असे त्यांनी म्हटले.