नवी मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्रातील अटल बिहारी वाजपेयी शिवारी-न्हावा शेवा अटल पुलाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.
अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, अशी घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यात अबकी बार 45 पार ही आमची जबाबदारी असल्याचे शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भूकंप येणार आहे. हा भूकंप विरोधी पक्ष सहन करु शकणार नाहीत, असा इशारा देखील शिंदेंनी दिला.
विकासाची विरोधी लोकांनी नेहमी पोटदुखी होत असते. रावणाच्या अंहकाराचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी रामसेतू तयार केला होता. तसेच ह्या सेतूमुळे अहंकारी लोकांचा नाश होणार आहे. अटल सेतूमुळे तिसरी मुंबई विकसित होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. देशाचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे. विकासासाठी केंद्र सरकार आमच्यासोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले