लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी मध्ये पोलिसांचा रूटमार्च

0
101

दि ५ मे (पीसीबी ) – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांकडून तयारी केली जात आहे. रेकोर्डवरील गुन्हेगारांना कायद्याच्या भाषेत तंबी देण्यासाठी परिसरात रूटमार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

शनिवारी (दि. 4) पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन रूटमार्च काढण्यात आले. सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते सात वाजताच्या कालावधीत हे रूटमार्च काढले गेले. दोन्ही वेळी सुमारे चार-चार किलोमीटरच्या अंतरावर हा रूटमार्च झाला.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील झोपडपट्टी, महत्त्वाची ठिकाणे, बाजारपेठ परिसरात घेण्यात आलेल्या रूटमार्च मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांसह केंद्रीय दलाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.