लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आदर्शरित्या नियोजन करणार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

0
3

पिंपरी,दि . १५ ( पीसीबी ) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजित करताना विविध संस्था, संघटना, नागरिक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल. हा कार्यक्रम उत्साहात व आदर्शरित्या साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे करण्यात येते. यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस, मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना प्रतिनिधीं यांचे समवेत आढावा बैठक काल आयोजित करण्यात आलेली होती,या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

सदर बैठकीस माजी नगरसदस्य भगवान शिंदे, काळूराम पवार,माजी नगरसदस्या कमल घोलप, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता विजय वायकर, डी.पी.पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, मेट्रो व्यवस्थापनाचे धनंजय कृष्णन,युवराज गावंडे, उप अभियंता ए.ए.कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे,संदीपान झोंबाडे, नितीन घोलप,संजय ससाणे,युवराज दाखले, अरुण जोगदंड, सुनिल भिसे, नाना कसबे, डी.पी.खंडाळे,सतिश भवाळ, सुनिल भिसे, आशाताई शहाणे, लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते भाई विशाल जाधव,चंद्रकांत लोंढे, संजय धुतडमल, उत्तम कांबळे, युवराज तिकटे, बाबासाहेब पाटोळे,  गणेश अवघडे, शिवाजी साळवे, श्रीमंत गायकवाड, शिवाजी चव्हाण, साहेबराव थोरात, कैलास पाटोळे, शिवाजी खडसे, विठ्ठल वाघमारे, तात्यासाहेब पाटोळे,उषा आल्हाट, धिरज सकट, सचिन कसबे, नाना सगर, सनी सकट, काशिनाथ आल्हाट,लक्ष्मण लोखंडे, बाळासाहेब खंदारे, मारूती सोनटक्के, ऋषिकेश गणगे, नानासाहेब नरमिंगे, अविनाश कांबीकर, राजू जाधव, शाहीर रामलिंग जाधव, राम चौधरी, नाना कांबळे, अर्जुन नेटके, मंदार बागव, विकास गायकांबळे, मयुर गायकवाड, सुरेश मिसाळ, शिवाजीराव साबळे, रामदास कांबळे, अण्णासाहेब कसबे, भानुदास साळवे,  महादू आडागळे, विष्णू कसबे, शंकर खवळे, आनंद कांबळे, वैभव वायकर, राजू आवळे, सुनील खुडे, सोमनाथ कांबळे, गणेश अवघडे, राम साठे, उषा आल्हाट, के.के. आल्हाट, राकेश भिलारे, स्वप्नील वाघमारे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे उपलेखापाल अनिल कु-हाडे,अभिजीत डोळस आदी उपस्थित होते.