लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – उल्हास जगताप

0
310

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन व्यापक स्वरुपात करून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असेल. विविध वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या दि. 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2022 च्या अनुषंगाने पूर्वनियोजन बैठक अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, शिवाजीराव साळवे, धम्मराज साळवे, मनोज तोरडमल, नितीन घोलप, सुनील भिसे, विशाल कसबे, डॉ. धनंजय भिसे, उप अभियंता आर. शिंदे, बाळासाहेब पाटील, अनिल तांबे, सामाजिक कार्यकर्ते, युवराज दाखले, सतीश भवाळ, शिवाजी खडसे, संतोष शिंदे, मोहन वाघमारे, राम बनसोडे, उत्तम कांबळे, तुकाराम गायकवाड, प्रा. बी. बी. शिंदे, तुकाराम गव्हाणे, स्वप्नील जाधव, संदिप जाधव, शंकर बनसोडे, चंद्रकांत लोंढे, सचिन अवघडे, बापू पवार, नागनाथ झोंबाडे, बाळासाहेब डोके, अरुण जोगदंड, राहुल सोनवणे, विठ्ठल कळसे, दिपक साबळे, अनिल गायकवाड आदींसह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या. यामध्ये विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असावा, स्थानिक कलाकारांना संधी द्यावी, कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करावी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळ्यांना विद्युत रोषणाई आणि दुरुस्ती करावी, शहरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, प्रबोधनात्मक कविसंमेलन, परिसंवाद, व्याखाने तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित साहित्याचा प्रसार, प्रचार व्हावा आदी सूचना विविध व्यक्तींनी बैठकीत मांडल्या. बैठकीचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.