पुणे दि. १३ (पीसीबी) – लोकमान्य हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा 25 वा वर्धापन दिन आज दि. 12/10/22 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .डॉ.श्रीकृष्ण जोशी, ग्रुप सिईओ मोहन नायर, लोकमान्य हॉस्पिटल निगडीचे सिओओ डॉक्टर उमाकांत गलांडे फिजोथेरपी डिपार्टमेंटच्या प्रमुख अनुप्रिया साळवी या उपस्थित होत्या . यावेळी गेली पंचेवीस वर्षे अहोरात्र सेवा देणा-या डाँ.अनुप्रिया साळवी, डाँ.पुजा कुलकर्णी, डाँ.अपुर्वा सुर्यवंशी, डाँ.निता कुरके, डाँ.काजोल सुवर्णा यांचा रुग्णसेवेबद्दल गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की ,लोकमान्य हॉस्पिटल ही संस्था गेली चार दशकाहून अधिक पिंपरी चिंचवड परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रम द्वारे रुग्णांना सेवा देत आहे. डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दीड लाखाहून अधिक अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्याचे बहुमोल काम करत असतानाच त्यांना शारीरिक दृष्ट्या पुनर्वसन करून पूर्वपदावर आणण्यासाठी सुयोग्य फिजिओथेरपी करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे बहुमोल काम गेली 25 वर्ष करत आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. अडीच लाखाहून अधिक रुग्णांवर व्यायाम ,भौतिकोपचार हे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने करताना त्यांचे पुनर्वसन करणे हे खरोखरच प्रशंसनीय काम आहे. 24 तास अहोरात्र रुग्णांना सेवा देताना त्यांना बरे करणे व त्यांच्या पायावर उभे करणे ही खरोखरच ईश्वरी सेवा होय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत सातत्याने संशोधन होऊन नाविन्यपूर्ण उपचार पद्धती या अस्तित्वात येत असतात. रुग्णाच्या नुसार लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मॅट्रिक्स थेरपी ,मॅग्नेटिक थेरपी यासारख्या तसेच निडलिंग यासारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती चा समावेश फिजिओथेरपी डिपार्टमेंट मध्ये रुग्णसेवेसाठी करण्यात आलेला आहे, ही पिंपरी चिंचवड करांसाठी उपयोगी गोष्ट आहे.
पंचविसाव्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य हाॅस्पिटलचे मँनेजिंग डायरेक्टर, डॉ.नरेंद्र वैद्य म्हणाले की 19 96 साली जेव्हा आम्ही देशात प्रथम तातडीची वैद्यकीय सेवा सुरुवात केली, तेव्हा रुग्णास प्रिव्हेन्शन ते रिँहबिलिटेशन ही सेवा देणारी परिपूर्ण अशी अपघात निवारण योजना बनवणे आवश्यक आहे या हेतूने अपघातामुळे विकलांग होणाऱ्या रुग्णांना परत पूर्व पदावर कामा जाण्यासाठी ,त्यांचे पुनर्वसन करणे हे ही महत्त्वाचे होते त्या दृष्टीने सुसज्ज अशी फिजोथेरपी डिपार्टमेंट ची सुविधा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केली. आज अस्थिरोग रिहँबिलिटेशन , हृदय रोगाचे रिहाबिलिटेशन , लहान मुलांचे रिहॅबिलिटेशन,न्युरो रिहँबिलीटेशन या सर्व सुविधा आणि रुग्णसेवा रुग्णांना देता येतील असे सुसज्ज फिजोथेरपी डिपार्टमेंट कार्यरत असुन त्याद्वारे जवळपास अडीच लाखाहून अधिक रुग्णांना ही रुग्ण सेवा दिली गेली आहे. एवढेच नव्हे तर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर रिप्लेसमेंट सर्जरी असेल, स्पाईन सर्जरी असेल अशा रुग्णांना घरी जाऊन फिजोथेरपी मिळावी या हेतूने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “होम फिजिओथेरपी केअर “देण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा ही उभी केली याचा मला आनंद होत आहे . यापुढेही जगातील प्रनगत व अद्ययावत यंत्रसामुग्री ही रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून स्पोर्ट्स मेडिसिनचा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही लोकमान्य हॉस्पिटल च्या वतीने प्रयत्न करत आहोत.