लोकमान्य हॉस्पिटल , चिंचवड येथे लोकमान्य हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त“लोकमान्य सुवर्ण आरोग्य योजना”

0
256

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड परिसरात कार्यरत असणाऱ्या लोकमान्य हॉस्पिटलच्या चिंचवड येथील शाखेचे हे पन्नासावे वर्ष असून पिंपरी चिंचवड परिसरातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक सेवा माफक दरात उपलब्ध करुन देणारे पहिले खाजगी हॉस्पिटल आहे . या हॉस्पिटलची मुहूर्तमेढ १९७४ साली डॉ व्ही जी वैद्य यानी रोवली . सद्यस्थितीत रुग्णालयाचे हे पन्नासावे वर्ष आहे.

या सुवर्ण वर्षा निमित्त संस्थेतर्फे विविध आरोग्य उपक्रम हाती घेण्याचा मानस असून लोकमान्य हॉस्पिटल , चिंचवड शाखेच्या वतीने जनसामान्यसाठी अत्याधुनिक उपचारामध्ये विविध सवलत देणारी “ लोकमान्य सुवर्ण आरोग्य योजनेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . याची घोषणा लोकमान्य हॉस्पिटचे उपाध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी केली. या वेळी लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सुनील काळे, कार्डिओलॉजिस्ट डॉ .मंगेश कुलकर्णी, डॉ. प्रीती रुपनार, डॉ. राम अग्रवाल व डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते . या योजनेमध्ये हृदय रोग तपासणी ही हृदयरोग तज्ज्ञ मार्फत होणार असून २ डी एको तपासणी ही केवळ ८००/- रुपये , अँगिओग्राफी केवळ ५९९९/- रुपये, मामोग्राफी तपासणी ७००/- रुपये , एक्स रे , रक्त लघवी तपासणी वर ४०% सवलत देण्यात येणार आहे.

लोकमान्य हॉस्पिटल मधे उपलब्ध तज्ज्ञ द्वारे तपासणीसाठी ५०% सवलत देण्यात येणार आहे .

लोकमान्य हॉस्पिटल मधे होणाऱ्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया व तपासणीसाठी तसेच दुर्भिणीद्वारे होणाऱ्या हर्निया, एपेंडिक्स, पित्ताशयाचे खडे, लघवीच्या लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया , कॅन्सर तपासणी व कॅन्सर शस्त्रक्रियावरही २५% सवलत देण्यात येणार आहे.

लोकमान्य हॉस्पिटलची ओळख ही ऑर्थोपेडिक उपचारांसाठी जगभरात झाली आहे . अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया व खुब्याच्या शस्त्रक्रियावरही २५% सवलत देण्यात येणार आहे.

सदर योजनेची अंमलबजावणी ही २० फेब्रुवारी २०२४ ते २० मार्च २०२४ पर्यंतच्या मर्यादित कालावधीत असून गरजू रुग्णांनी यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या चिंचवड शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन लोकमान्य चिंचवडचे प्रमुख डॉ श्रीकृष्ण जोशी यांनी केले