लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घसरगुंडी

0
159

मुंबई, दि. १० (पीसीबी) – इंडिया टुडने सी व्होटर्सच्या सहकार्याने मूड ऑफ द नेशने केलेल्या सर्वेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1.9 टक्के लोकांची पसंती मिळाली होती. या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री शिंदे शेवटून तिसऱ्या स्थानी होते. असाच सर्वे महाराष्ट्रातही करण्यात आला होता. आता राज्यातील किती टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. नेमके ते कोणत्या स्थानी आहेत? हे जाणून घेऊयात.

मूड ऑफ द नेशनमध्ये देशातील प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा देखील सर्वे केला आहे. या सर्वेत ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी आहेत.नवीन पटनायक यांना त्याच्याच राज्यातील 52.7 टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे. असाच सर्वे ऑगस्टमध्ये देखील करण्यात आला होता त्यावेळेस त्यांना 61.3 टक्के मते पडली होती. त्याच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी योगी आदित्यनाथ आहेत, त्यांना 51.3 टक्के मते मिळाली आहे. तसेच ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेत त्यांना 46.9 टक्के मते पडली आहेत.

तिसऱ्या स्थानी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत. त्यांना आसामच्या 48.6 टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे. ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेत त्यांना 49.2 मते पडली आहेत. चौथ्या स्थानी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल आहेत, त्यांना 42.6 मते पडली होती. त्यांना ऑगस्टच्या सर्वेमध्ये 55.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.

पाचव्या स्थानी त्रिपुराचे मानिक साहा आहेत, त्यांना 41.4 टक्के मते पडली आहेत. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद साह 41.1 टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 40.1 टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे. ते सातव्या स्थानी आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 36.5 टक्के जनतेने मते दिली आहेत. ते आठव्या स्थानी आहेत. तमिळनाडूचे एम के स्टॅलिन नवव्या स्थानी आहे. त्यांना 35.8 टक्के मते मिळाली होती. दहाव्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्यांना 32. 8 बंगालच्या जनतेने पसंती दर्शवली आहे. ही झाली टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी. या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यास एकनाथ शिंदे अपयशी ठरताना दिसत आहेत.

देशात कोणत्या स्थानी?
मुड ऑफ द नेशन सर्वेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त 1.9 टक्केच लोकांची पसंती आहे. एकंदरीत संपूर्ण देशातील मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे हे शेवटून तिसऱ्या स्थानी येतात. तर पहिल्या स्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात.