लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप “शक्तिस्थळाचे शनिवारी भूमिपूजन

0
3

पिंपरी, दि. १० – “प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतिक ” लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप “शक्तिस्थळाचे भूमिपूजन शनिवारी सकाळी नऊ वाजता पिंपळे गुरव येथे आयोजित करण्यात आले आहे.
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. प्रमुख उपस्थिती खासदार श्रारंग बारणे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पा रेणुसे, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, शंकर मांडेकर, उमा खापरे, अमित गोरखे आदी उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार आश्विनी जगताप, आमदार शंकर जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप हे प्रमुख निममंत्रक आहेत.

वेळ : शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ सकाळी ०९.०० वा.
स्थळ : मारुती मंदिराजवळ, पिंपळे गुरव गावठाण, पुणे