लॉजवर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक, एका पिडीतेची सुटका

0
670

आळंदी, दि. १३ (पीसीबी) :- लॉजवर बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.11) आळंदी मरकळ , आळंदी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा यांनी केली आहे.

दिनेश नागेश्वर यादव (वय 42 रा. आळंदी) व मॅनेजर विजय शिवचरण यादव (वय 30. रा बिहार) अशी अटक आरोपींची नाव आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार मारुती करचुंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीररित्या पिडीते कडून त्यांच्या उपजिविकेसाठी वेश्या व्यवसाय करून घेत होते. यावरून आळंदी पोलिसांनी आरोपी विरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.