लॉजच्या खोलीत प्रेयसीवर वार करून प्रियकराने घेतला गळफास

0
127

पिंपरी, दि. 11 (पीसीबी) : लॉजच्या खोलीत प्रियकराने प्रेयसीवर वार करून स्वतः गळफास घेतला. ही गुरुवारी (दि. 10) दुपारी चार वाजता पिंपरीतील एका लॉज मध्ये घडली. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही.

नितेश नरेश मिनेकर (वय 34, रा. येरवडा) असे प्रियकराचे नाव आहे. तर कोल्हापूर येथील 28 वर्षीय तरुणी गंभीर जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितेश आणि त्याची प्रेयसी हे दोघे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील एका हॉटेलमध्ये आले. त्यांनी आपली आधारकार्ड दाखवून एक खोली बुक केली. खोलीमध्ये गेल्यानंतर काही मिनिटांतच खोलीमधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे हॉटेल मधील कर्मचारी पळत खोली समोर गेले. त्यांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, कोणीही रूमचा दरवाजा उघडला नाही.

कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पुढच्या पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी, दरवाजा वाजवत, आम्ही पोलीस आहोत, दरवाजा उघडा, असे सांगितले. त्यानंतर नरेश याने, पाच मिनिट थांबा, उघडतो दरवाजा, असे सांगितले. मात्र, काही वेळ जाऊनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. तेंव्हा आत नितेशने फॅनला लटकून गळफास घेतल्याचे आढळून आले. तर, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी तातडीने तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.