लॉक तोडून घरातील दागिने चोरले

0
395

तळेगाव दाभाडे, दि. २५ (पीसीबी) – लॉक तोडून घरातील कपाटातून दागिने चोरून नेले आहेत. हि चोरी रविवारी (दि.23) ते समोवारी (दि.24) या कालावधीत वराळे येथील भिसे कॉलनी येथे घडली आहे.

याप्रकऱणी देविदास रामा गवस (वय 33 रा. वराळे) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्याने कपाटातील 23 ग्रॅम वजनाचे 69 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.