दिघी, दि. ९ (पीसीबी)
एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना दिघीतील मॅक्झीन चौक येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुरज राजकुमार गायकवाड (वय ३०, रा. परांडेनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ८) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जून २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत विसावा लॉज, मॅक्झीन चौक, आळंदी रोड, दिघी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करीत तिला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी यांनी आरोपी सोबत संपर्क करणे बंद केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व तिच्या नातेवाईकांना फोन करून तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.