लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ केला आणि …

0
3

दि. 18 (पीसीबी) – कर्जत तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. २२ वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिकसंबंध करत असतानाचे तिला न कळत मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, याबाबत पीडितेच्या कुटुंबाकडून नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाविरोधात बाललैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.