नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसेना महिला आघाडीने जल्लोषाकरत केले निर्णयाचे स्वागत; मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे मानले आभार
मुंबई,दि.१०(पीसीबी) : भारतात 1000 मुलींच्या पाठीमागे 940 मुली जन्म घेतात राज्यात ही संख्या 929 आहे. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा मुलींना गर्भातच मारलं जातं, म्हणूनच ही संख्या बदलण्याचं काम सरकारच्या वतीने सातत्याने केलं जात आहे. सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार मुलगी जन्मली की 5000 रुपये तसेच मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एक लाखापेक्षाही अधिकची रक्कम त्या मुलीला मिळणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
नकोशी असणारी मुलगी ही समाजाचं देशाचं भूषण आहे. त्यामुळे मुलीला जगण्याची संधी मिळावी या करिता राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार या सर्वांनी महाराष्ट्रातील स्त्री शक्तीला वंदन म्हणून ही योजना सुरू केली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरची योजना लागू केल्याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना महिला उपनेत्या सर्वश्रीमती शीतल म्हात्रे, कला शिंदे, शिल्पा देशमुख यांसह शिवसेना महिला आघाडीच्यावतीने नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात शिवसेनेच्यावतीने जल्लोषा करत निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले.