लुटमार करणाऱ्या चोराला चालकानेच केले पोलिसांच्या हवाली

0
188

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – गाडी चालकाला अडवून लुटमारी करणाऱ्या चोराला चाळकानेच पकडुन पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना सोमवारी (दि.29) मोशितील देहू रस्ता येथे घडली आहे.

जगदीश सुखराम सिंह (वय 40 रा.मोशी) यांनी एमयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. यावर बाबा तालेल्ला इराणी (वय 55 रा. शिवाजीनगर,पुणे) याला अटक केली असून त्याचा साथिदार अली सरू इराणी (वय 30 रा.हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यदिला दमदाटी करून फिर्यादी यांच्या कडून 19 हजार 500 रुपये हिसकावून घेतले.फिर्यादी यांनी पाठलाग करून एका आरोपीला पकडले . दुसरा साथिदार 10 हजार 500 रुपये घेऊन पळून गेला. फिर्यादी यांनी आरोपीला पकडुन पोलिसांच्या हवाली केले.एमयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.