लिफ्टच्या डक्ट मध्ये पडून 64 वर्षीय मजुराचा मृत्यू

0
216

बांधकाम साइटवर काम करणाऱ्या एका 64 वर्षीय मजुराचा लिफ्ट डक्टमध्ये पडून मृत्यू झाला आहे. ही घटना 28 एप्रिल 2024 रोजी किवळे येथील मेरिडियन बिल्डिंग येथे घडला आहे.

याप्रकरणी बिपिन मुन्नर चौहान (वय 35 रा. धायरी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.3) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी रघु राठोड, वसंत राठोड, राजू साहू या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात प्रदीप चौहान (वय 64 ) या मजुराचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी मयत प्रदीप चौहान यांना कामावर लावले मात्र त्यांना कोणतेही सुरक्षिततेची साधने दिली नाही. तसेच लिफ्टच्या इथे धोकादायक पद्धतीने साहित्य ठेवल्याने प्रदीप चौहान यांचा काम करताना तोल गेला व ते थेट लिफ्ट च्या डक्टमध्ये पडले. चौहान गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावरून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.