लिंकद्वारे केले बँक खाते रिकामे

0
270

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – केवायसी पेंडिंग असल्याच्या मेसेजमध्ये एक लिंक असल्याने व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केले. त्याआधारे व्यक्तीची फसवणूक करून बँकेची गोपनीय माहिती घेत एक लाख ९९ हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २) दुपारी कासारवाडी येथे उघडकीस आला.

युसुफ जब्बार शेख (वय ३७, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांना गुरुवारी दुपारी एक मेसेज आला. त्यामध्ये शेख यांच्या बँक खात्याची केवायसी पेंडिंग असल्याचा खोटा मजकूर होता. त्यातच एक लिंक देण्यात आली होती. शेख यांनी केवायसी अपडेट करण्यासाठी लिंकवर क्लिक केले असता तिथे बँकेच्या पेजप्रमाणे बनावट पेज उघडले गेले. तिथे शेख यांना त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारण्यात आली. ती माहिती भरली असता त्याच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ९९ हजार ७७८ रुपये कमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.