लायसनच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक

0
458

गहुंजे, दि. २५ (पीसीबी) -परमिट रूम आणि बिअर बारचे लायसन काढून देतो असे सांगून एकाची नऊ लाख 58 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. ही घटना गहुंजे येथे घडली.

नितीन आवटी आणि राज गायकवाड (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अनंता वसंत बोडके (वय 49 रा. गहूंजे, ता. मावळ) यांनी सोमवारी (दि. 23) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये गहुंजे येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना बियर बार व परमिट रूमचे लायसन काढून देतो, असे सांगून फिर्यादी बोडके यांच्याकडून दहा लाख 75 हजार रुपये घेतले. त्यांना बियर बार व परमिट रूमचे लायसन काढून न देता तसेच फिर्यादी यांचे पैसे परत न देता नऊ लाख 58 हजार 500 रुपये रकमेचा अपहरण केला.