लायन्स क्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांचे निधन

0
14

दि.७(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ उद्योजक आणि लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशल पुणे, नगर, नाशिकचे प्रांतपाल ओमप्रकाश पंढरिनाथ पेठे (वय-५७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे सामाजिक कार्यकर्त्या पत्नी श्रद्धा, उद्योजक मुलगा स्वराज आणि कन्या सीए श्रावणी असा परिवार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांचे ते मेहुणे होतं. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर निगडी येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे.

लायन्स क्लबच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यांत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ओमप्रकाश पेठे यांचा पुढाकार होता. अनेक वर्षे त्यांनी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅनलचे पुणे, नगर, नाशिक चे प्रांतपाल म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे कायम होती. राष्ट्रीय रेड्डी समाज, आळंदी या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. लातूर जिल्हा मित्र मंडळाचे तसेच वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मित्र मंडळाचेही ते सल्लागार होते. भोसरी येथे एक्सपोनेशन इंजिनिअरिंग प्रा. लि.ही कंपनी त्यांनी उभी केली.